पुणे : अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला उजाळा देत, माँ आशापुरा माता मंदिरात माँ आशापुरा माता चॅरिटेबल ट्रस्ट व लायन्स पूना गणेशखिंडच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवार दि. 30 ऑक्टोबर 2024 रोजी भव्य ‘दिवाळी पहाट’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पहाटे पाच वाजता सहपरिवार येणाऱ्या भाविकांना माँ आशापुरा माताच्या आरतीचा लाभ लकी ड्रॉ मार्फत मिळणार आहे. तसेच मंदिराच्या प्रांगणात सहपरिवार पणत्यांचे दीप प्रज्वलन केले जाणार आहे. कार्यक्रम समितीकडून मंदिरात दिव्यांची पाकिटे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तसेच खास आकर्षण म्हणून यावर्षी वर्ल्डबुक ऑफ रेकॉर्ड आणि यूके अवॉर्ड विजेते गायक विवेक पांडे आणि प्रितीशा पांडे यांच्या सुरेल गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच मराठी आणि हिंदी भक्तिमय भजनांचे ही आयोजन करण्यात आले आहे. यंदा भक्तांसाठी मंदिराची खास सजावट व विशेष सोयींची व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांच्या प्रकाशात उजळलेले मंदिर, संगीतमय वातावरण आणि फुलांच्या सजावटीने सुशोभित परिसर हे एक वेगळाच अनुभव देतो. त्यामुळे सर्वांना शुद्ध वातावरणात दिवाळी साजरी करण्यासाठी विनंती करण्यात आली असून यंदाच्या दिवाळीला भक्तिमय आणि सांस्कृतिक स्वरूप देण्याचा संकल्प या सोहळ्याच्या माध्यमातून साकारला जाणार आहे. त्यामुळे माँ आशापुरा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सर्व भाविकांना बुधवार दि. 30 ऑक्टोबर 2024 ला सकाळी 5 वाजता या सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.