पुणे | 5 सप्टेंबर हा दिवस स्वतंत्र्य भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन… हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो.
समाजाचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर, त्या समाजातील नवीन पिढीला शिक्षण कोण देतं हे अत्यंत महत्वाचं ठरतं. म्हणून हे शिक्षण देणारे शिक्षक समाजाच्या, देशाच्या आणि एकूणच विश्वाच्या कल्याणात सर्वाधिक मोलाची भूमिका बजावतात.
समाज, देश आणि विश्वाच्या दृष्टीकोनातून बहुमोल असलेल्या शिक्षकांच्या सन्मानार्थ शिक्षक दिनाच्या निमित्ताने 5 सप्टेंबर रोजी पाषाण येथील लोकसेवा ई स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे विशेष गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
शिक्षक दिनानिमित्त झालेल्या या गौरव सोहळ्यास सोलापूर येथील श्राविका इंग्लिश मिडियम स्कूल चे माजी मुख्याध्यापक व प्रथम कोचिंग इन्स्टिट्यूटचे सह- संस्थापक प्रेमचंद आग्रे, प्रथम कोचिंग इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा. प्रदीप पाटील, युनिक कोचिंग क्लासेसचे संदिप आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ यांच्या हस्ते शिक्षण सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्याविष्काराने शिक्षकांना मानवंदना दिली.
याप्रसंगी लोकसेवा ई स्कूलच्या संचालिका निवेदिता माडकिकर, प्राचार्या जया चेतवाणी, गणेश शहा, साक्षी काबरा, स्वाती बाविस्कर, संगीता पाटील, मिनु पुरोहित, तिरखुंडे, सुरेश पाटील, विशाल यांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी सर्व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.