पुणे | माँ आशापुरा माता मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान उत्साहात नवरात्र महोत्सव होणार आहे. त्याच्या नियोजनाच्या निमित्ताने बुधवारी सायंकाळी बैठक पार पडली. माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष विजय भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये नवरात्र महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे नवरात्र महोत्सव साजरा करण्यावर निर्बंध होते. यावर्षी कोरोनाचे सावट नसल्याने यंदाचा नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. २६ सप्टेंबर रोजी घटस्थापना झाल्यानंतर पुढील नऊ दिवस अभिषेक, नवचंडी महायज्ञ, श्रीसुक्त पाठ, भजन, माता की चौकी हे विधी व कार्यक्रम होणार आहेत. याबरोबरच दरवर्षीप्रमाणे समाजातील कर्तृत्ववान महिलांचा नवदुर्गा सन्मान देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच, चालु घडामोडींवर आधारित विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
आढावा बैठकीत भक्तांसाठी दर्शनाची व्यवस्था, त्यांची सुरक्षा, वाहतूक व पार्किंग, प्रसाद, अभिषेक व महायज्ञ यासाठीच्या नियोजनासंदर्भात मागोवा घेण्यात आला. आणि भक्तांच्या दृष्टीकोनातून सर्व व्यवस्था चोख होण्यासंदर्भात तयारी करण्यात आली आहे. याप्रसंगी ट्रस्टचे विश्वस्त चेतन भंडारी, भारती भंडारी, लीना भंडारी, लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंडचे श्याम खंडेलवाल, अध्यक्ष राजीव अगरवाल, दिलीप मुनोत, मनोज छाजेड, अशोक भंडारी, अनिल गेलडा, मंगेश कटारिया, पंकज कर्नावट, आदेश खिंवसरा, राजेंद्र गोयल, शशिकांत भंडारी, बालासाहेब बोरा, लकिशा मर्लेचा आदी मान्यवर उपस्थित होते.
माँ आशापुरा माता मंदिरात (गंगाधाम चौक, पुणे ) होणाऱ्या नवरात्र महोत्सवासंदर्भात अधिक माहितीसाठी व अभिषेक व नवचंडी यज्ञ च्या बुकिंगसाठी 9372727907 / 9067534088 किंवा www.ashapuramatamandir.com यावर संपर्क साधावा.