पुणे | विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी आणि आत्महत्येच्या घटनांमध्ये कमालीची वाढ होत चालली आहे. आता एक अशीच एक धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड येथे घडली आहे. मैत्रिणीसमोर मारहाण करत अपमानित केल्याने प्रतिक संतोष कुतवळ ( रा.शास्त्री चौक, भोसरी ) नामक तरुणाने आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक आणि त्याच्या एका मैत्रिणीचे प्रेमसंबंध होते. याच प्रेमसंबंधातून मैत्रिणीसमोरच प्रतिकला मारहाण केली होती. याचं प्रतीकला खूप वाईट वाटत होतं. या मारहाणीमुळे अपमानित झाल्याने त्याने टोकाचं पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी 14 सप्टेंबर रोजी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, याप्रकरणी प्रतिकचे वडील संतोष जालिंदर कुतवळ ( वय 41, रा. भोसरी ) यांनी फिर्याद दिली आहे. प्रतिकच्या वडिलांच्या फिर्यादीनंतर प्रथमेश महादू पाठारे ( वय 20, रा. पाठारे मळा, चऱ्होली ) नामक तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.