- २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान ‘धडकन प्रकल्पाचे’ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत उद्घाटन तर, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत समारोप
पुणे | जागतिक हृदय दिनानिमित्त रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ आणि रिव्हाइव्ह हार्ट फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सीपीआर जागरूकता आणि प्रशिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा प्रकल्प ‘धडकन’ नावाने राबविला जाणार आहे. रिव्हायव्ह हार्ट फाउंडेशनसह रोटरी क्लब च्या वतीने २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ दरम्यान सीपीआर संबंधी जागरूकता करण्यासाठी प्रशिक्षण व प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहेत, अशी माहिती रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ चे गव्हर्नर डॉ. अनिल परमार आणि रिव्हायव्ह हार्ट फाउंडेशनचे व प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या धडकन प्रकल्पाचे उद्घाटन 24 सप्टेंबर रोजी नॅशनल फिल्म अर्काइव्ह येथे सकाळी 10.30 वाजता अभिनेत्री मृणाल कुलकर्णी व अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ.जालिंदर सुपेकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. तर, 2 ऑक्टोबर रोजी टिळक स्मारक मंदिर येथे सकाळी 9 वाजता माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे आणि रोटरी क्लबचे ३१३१ चे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ.अनिल परमार यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाच्या समारोपाचा कार्यक्रम होणार आहे.
रोटरी क्लबचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. अनिल परमार आणि रिव्हायव्ह हार्ट फाउंडेशनचे प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ हे यांच्या मार्गदर्शनाखाली हा धडकन प्रकल्प राबविला जाणार आहे. 2017 मध्ये सुरू केलेले रिव्हाइव्ह हार्ट फाउंडेशन (iCARE) हा भारतातील अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे जो आपत्कालीन वैद्यकीय मदत येईपर्यंत, सडन कार्डियाक अरेस्टच्या पीडित व्यक्तीला जिवंत कसे ठेवायचे याचे महत्त्वपूर्ण ज्ञान प्रदान करण्यासाठी स्वतःला समर्पित करतो.
24 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा आठवडा सडन कार्डियाक अरेस्ट अवेअरनेस वीक 2022 म्हणून घोषित करण्यात आला आहे. या सप्ताहा दरम्यान रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 आणि रिव्हिव्ह हार्ट फाउंडेशन यांच्या वतीने CPR शिकवण्यासाठी विविध गटांसोबत ऑनलाइन, ऑफलाइन आणि हायब्रिड प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आली आहेत.
CPR प्रशिक्षण हृदयरोग तज्ज्ञांद्वारे दिले जाणार आहे. डॉ. जगदीश हिरेमठ, डॉ. सुनील साठे आणि मानसशास्त्रज्ञ डॉ. किंजल गोयल त्यांच्या हृदयरोग तज्ज्ञांच्या टीमसह सज्ज असणार आहेत. ह्रदये पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी आपण उपस्थित राहावे. प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे. दोन्ही सभागृह हाऊसफुल्ल झाल्यानंतर प्रवेश बंद केला जाईल.
‘धडकन’ हा प्रकल्प लक्ष्मी रोड होस्ट क्लब आरसीपी चे अध्यक्ष हेमंत शिरगुप्पी, सह-यजमान क्लब आरसीपी डाउनटाउन अध्यक्ष झिमरा इस्रायल, आरसीपी इंदापूरचे अध्यक्ष नरेंद्रकुमार गांधी, आरसीपी सेंट्रल अध्यक्ष उदय धर्माधिकारी, आरसीपी सहवास अध्यक्ष अजय मुताटकर, आरसीपी बिबवेवाडी अध्यक्ष वर्धमान गांधी, आरसीपी गांधी भवनच्या अध्यक्षा पद्मजा जोशी, आरसीपी निगडीच्या अध्यक्षा प्रणिता अलूरकर आणि जिल्हा संचालक रोग प्रतिबंधक व उपचार आरटीएन पल्लवी साबळे आणि टीम डॉ. आनंद केंच, आरटीएन महेंद्र चित्ते, आरटीएन श्याम धुमाळ आणि डिस्ट्रीक्ट पीआय संचालक डॉ जिग्नेश पंड्या यांनी संयुक्तपणे आयोजित केला आहे.