पुणे | कोरोनाच्या संकटामुळे ग्रामीण तसेच शहरी अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊन अनेकांचे व्यवसाय बुडाले, अनेकांचे अडचणीत आले… रोजगार बुडाले, काहींच्या नोकऱ्या गेल्या तर, लघु आणि मध्यम व्यवसाय बंद झाले. यामुळे व्यावसायिकांचे मानसिक खच्चीकरण देखील झाले आहे. यातून भरारी घेण्यासाठी युगल धर्म संघच्या वतीने येत्या रविवारी (२५ सप्टेंबर) प्रसिद्ध व्यवसाय मार्गदर्शक राहुल कपूर यांच्या ‘करो बिझनेस रिलोडेड’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
राहुल कपूर हे प्रेरणादायी वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. आयआयएम बंगळुरु आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आपीएल संघासाठी ते काम करतात. त्यांनी १५ हून अधिक देशांतील तीन लाखांहून अधिक लोकांना त्यांच्या मार्गदर्शनातून प्रेरित केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा अनेक व्यावसायिक व उद्योजकांना फायदा झाला आहे. पुण्यातील व्यावसायिक व उद्योजकांनाही त्यांचे मार्गदर्शन मिळावे या हेतुने युगल धर्म संघातर्फे या शिबिराचे २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता पुणे कॅम्प मधील नेहरु मेमोरियल हॉल येथे आयोजन केले आहे. या शिबिराचे मित्तल ब्रदर्स हे मुख्य प्रायोजक आहेत.
रविवारी (२५ सप्टेंबर) होणाऱ्या शिबिरास नावनोंदणी आवश्यक असून जास्तीत जास्त व्यावसायिकांनी या शिबिरास उपस्थित राहावे, असे आवाहन युगल धर्म संघाचे अध्यक्ष विजय भंडारी यांनी केले आहे. ते म्हणाले की, युगल धर्म संघामध्ये युवा पिढीचा समावेश आहे. युवा पिढीच्या प्रगतीसाठी युगल धर्म संघातर्फे अनेकविध उपक्रम राबविले जातात. प.पू.प्रवीणऋषी म.सा. यांच्या मार्गदर्शनाखाली युगल धर्म संघाची स्थापना झाली आहे.