जळगाव | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव दौऱ्यावर असून आज मुक्ताईनगर येथे जाहीर सभा झाली. यासभेत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी पक्षावर प्रहार केला. यातच एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. मुक्ताईनगर शहरातील क्रीडा संकुलाच्या मैदानामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली. यावेळी ते म्हणाले कि, शिवसेनेत असताना आम्ही उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी पक्ष संपवीत आहे, हे वारंवार सांगत होतो. त्यावेळी गुलाबराव पाटील देखील म्हणत होते, त्यांना सांगा राष्ट्रवादी आपल्याला संपवीत आहे. मी स्वतः त्यांना पाच वेळा सांगितले, कि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेलो ती चूक सुधारवा पण ऐकले नाही.
ते पुढे म्हणाले, की आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि मोदींचा फोटो लावला आणि निवडणूक जिंकलो. शिवसेनेतून बाहेर पडत आम्ही बरोबर केले. मात्र झोपेचे सोंग घेतलेल्याला कसे जागे करणार? आम्ही चूक सुधरवली मग गद्दार कोण? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला. आमदार खासदार यांची काम होत नव्हती, आता ती दोन महिन्यात केली. विरोधी पक्ष आता घाबरला असून एकनाथ शिंदे गणपती मंडळ फिरतो, घराघरात जातो. त्यामुळे ते फिरत आहेत. आता त्यांनी अर्धे पुण्य मला द्यायला हवे. तर काहीजण दोन मुख्यमंत्री ठेवण्याचे सांगतात. मात्र त्यांना आधीचा अनुभव असल्याने ते असे म्हणत असल्याचा खोचक टोलाही मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना लगावला.
जळगावात गुलाबराव पाटलाचे प्रस्थ आहे. मात्र गुलाबराव पाटलांना हिणवले जाते. कुणीही हिणवण्याचे काम करू नये. मी स्वत शेतकऱ्याचा मुलगा आहे, मात्र मुख्यमंत्री झाल्यावर ते चालत नाही. सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजे का? असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला. शाहजी बापू स्टेजवर आल्यावर लोकांच्या टाळ्या वाजल्या. मुख्यमंत्र्यांनी शाहजी बापूचा फेमस डायलॉग म्हटला. दोन वर्षात आम्ही एवढं काम करू की औषधाला सुद्धा कोणी शिल्लक राहिला नही राहणार. फक्त गोमुत्र शिंपडणारे तेवढे शिल्आलक राहतील? असा टोला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.