मुंबई | मागच्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेला दसरा मेळाव्यावरून यंदा राजकारण सुरू असल्याचे दिसून येत आहे. मागच्या काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे गटाकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेत अर्ज केला होता. परंतु हे अर्ज मुंबई महापालिकेने ठाकरे आणि शिंदे गटाची परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी परवानगी नाकारत असल्याचे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान यावरून शिवसेना आणि शिंदे गटातील नेत्यांकडून आरोप पत्यारोप सुरू झाले आहेत.
दसरा मेळाव्या प्रकरणी शिवसेनेकडून मुंबई उच्च न्यायालयात याचीका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान आज यावर सुनावणी होणार आहे. महापालिकेकडून शिवाजी पार्क मैदानाच्या परवानगीसाठी होणाऱ्या विलंबामुळे शिवसेनेने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. परंतु, शिवाजी पार्क दसरा मेळाव्याला कुणालाच मिळणार नाही, असा निर्णय महापालिकेनं घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मुंबई महापालिकेकडून दोन्ही गटाला दिली जाणार नाही. शांतता आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन परवानगी नाकारली असल्याचे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. महापालिकेकडून शिवसेना आणि शिंदे गट यांना परवानगी नाकारल्याचे पत्र पाठवण्यात आले आहे. मुंबई महापालिका आयुक्त परिमंडळ 2 यांनी परवानगी नाकारल्याचे पत्र दोन्ही गटांना दिली आहे.