शिवसेनेची परंपरा असलेला दसरा मेळावा होणार की नाही याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा हा नेहमी शिवाजी पार्क येथे होत असतो, पण यंदा शिवसेनेत बंडखोरी करून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे यांना देखील दसरा मेळावा घ्यायचा आहे.
दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांमध्ये सुरस लागली असताना मुंबई महापालिकेने मात्र दोघांनाही परवानगी नाकारली आहे.
शिंदे गटाला बीकेसीमधील मैदानासाठी यापूर्वीच देण्यात आली आहे. मात्र उध्दव ठाकरेंच्या शिवसेना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.
महापालिकेच्या या निर्णयानंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेने ओपन चॅलेंज दिले आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा गनिमी काव्यानं शिवतीर्थीवरच होणार असे आव्हान मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे.
महापालिकेच्या निर्णयानंतर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचा दसरा मेळावा हा गनिमी काव्यानं शिवतीर्थीवरच होणार, असे सांगत शिंदे गटाला ऑपन चॅलेंज दिले आहे.
त्याचबरोबर, शिंदे गटाला बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये परवानगी मिळालेली असतानाही शिवाजी पार्कसाठी परवानगी मागत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना मानायचं मात्र शिवसेनेची गळचेपी करायची, पक्षातील दलबदलू लोकं आज आमदार-खासदार झाले, ते बाळासाहेबांचे विचार काय पुढे नेणार? असा
जाब त्यांनी विचारला आहे. शिंदे गट सध्या भाजपचीच स्क्रिप्ट वाचतोय असा टोला त्यांनी लगावला आहे.
मुंबई महापालिकेनं दोन्ही अर्जांवर निर्णय दिला आहे. व पत्रात महापालिकेची बाजू मांडली आहे.पत्रात असे लिहाण्यात आले आहे की, दोन्ही परस्पर विरोधी अर्जदारांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज पार्क मैदानात दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी मिळणेसाठी अर्ज केले असताना कोणत्याही एका अर्जदारास दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी दिल्यास त्यामधून शिवाजीपार्कच्या संवेदनशील परीसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याअनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उद्भवण्याची शक्यता असल्याने उप आयुक्त, (परि.-2) या पदावरील प्राप्त अधिकारांचा वापर करुन दिनांक 05.10.2022 रोजी दसरा मेळावा साजरा करण्याकरिता प्राप्त झालेला आपला अर्ज नामंजुर करण्यात येत आहे.
मुंबई | शिवसेनेची परंपरा असलेला दसरा मेळावा होणार की नाही याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा हा नेहमी शिवाजी पार्क येथे होत असतो, पण यंदा शिवसेनेत बंडखोरी करून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे यांना देखील दसरा मेळावा घ्यायचा आहे.