सुप्रीम कोर्टात शिवसेनेची बाजू मांडणारे वकिल कपिल सिब्बल म्हणाले की, शिंदे गट १९ जुलैला आयोगाकडे गेला. शिंदेंच्या सदस्यत्वावर आमचा प्रश्न आहे. २९ जूननंतर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. यामुळे मूळ याचिकेवर आधी सुनावणी होणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी मांडलं आहे.
सुप्रीम कोर्टातील महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुरु असलेली सुनावणी काही काळ थांबवली होती. त्यानंतर न्यायाधीशांनी आपापसात चर्चा केली. त्यांची चर्चा आता संपली असून कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली आहे.