पुणे | वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरलेला चांदणी चौकातील पूर अखेर पाडला जाणार असून, येत्या दोन ऑक्टोबर रोजी पहाटे दोन वाजता पाडला जाणार आहे. चांदणी चौकातील पुल पाडण्यासंदर्भात आज बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनू दिली आहे.
पूल पाडण्यात येणार असल्याने 1ऑक्टोबर 2022 रात्री 11 ते 2 ऑक्टोबर सकाळी 8 वाजेपर्यंत हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. पूल पाडण्यासाठी एडिफिस या कंपनीची निवड करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यावेळी सांगितले. देशमुख म्हणाले की, पूल पाडण्याच्या कामाच्या पूर्व तयारी करण्यात आली आहे. याआधी १५ सप्टेंबर रोजी पूल पाडला जाईल असे निश्चित करण्यात आले होते. मात्र, पाऊस पडल्यामुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. पूल पाडण्यात येणार असल्याने या परिसरातील काही इमारती निर्मनुष्य केल्या जाणार आहे.
कसा पाडला जाणार पूल?
पूल पाडण्यासाठी स्फोटांचा वापर केला जाणार आहे. यासाठी ४ लोकं असतील. ज्यात ब्लास्ट डिझायनर, इंजिनियर आणि पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश असेल. 2:30 वाजता debris तिथून काढण्याचे काम सुरू होईल. 2 तारखेच्या सकाळी 8 नंतर रोड सुरू करण्यात येईल.
कुठले रस्ते बंद असणार ?
पूल पाडण्याच्या आदल्या दिवशी रात्री 11 ते 8 दरम्यान जड वाहने मुंबईकडून येणारी तळेगाव कडे थांबवण्यात येणार आहे. तसेच साताराकडून येणारी जड वाहने शिवापूर येथे थांबवली जाणार आहे. मुंबईकडून येणाऱ्या हलक्या वाहनांना सोमाटणे फाटा हा रस्ता उपलब्ध असेल. त्याशिवाय दुसरा मार्ग म्हणजे वाकड वरुनही वाहनांना पुण्यात प्रवेश करता येणार आहे. तर, तिसरा मार्ग बाणेर दर्शना हॉटेल असणार आहे.