नवी दिल्ली | भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीच्या कारकिर्दीची आणि उत्कृष्ट खेळाची दखल घेत फिफाने त्याचे कौतुक केले आहे. तीन भागांची एक मालिका प्रसिद्ध केली आहे. FIFA+ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही मालिका पाहता येणार आहे.
तुम्ही रोनाल्डो, मेस्सी यांना ओळखता, आता आणखी एका महान खेळाडूची कथा पाहा. देशाकडून खेळताना सर्वाधिक गोल करणाऱ्या फुटबॉलपटूंमध्ये तो तिसरा आहे. सुनील छेत्री असे त्याने नाव आहे. कॅप्टन फॅन्टास्टिक ही मालिका FIFA+ वर पाहता येईल, असे ट्विट करून फिफानेच याबद्दलची ही माहिती दिली आहे.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा रोनाल्डो याने ११७ गोल केले असून तो पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्या नंतर लिओनेल मेस्सी याने ९० गोल केले असून तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. आणि भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने ८४ गोल केले आहेत. रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी ह्या आंतरराष्ट्रीय खेळाडूनंतर भारतीय सुनील छेत्री चा नंबर येतो आहे. तीन भागांच्या मालिकेतील पहिल्या भागात छेत्रीने फुटबॉलला कशी सुरुवात केली, त्यानंतर २० व्या वर्षी भारताकडून पदार्पण केले, याचे चित्रीकरण आणि या बद्दलची संपुर्ण माहिती दिली आहे.