मुंबई | पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर १० ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. सक्तवसुली संचलनालयाने (ED) संजय राऊत यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक केली. संजय राऊत सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत.
संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला परंतु यावरील सुनावणी विशेष पीएमएलए न्यायालयात सुरू आहे. पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊतच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप ईडीने केला आहे.
ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली. यामुळे संजय राऊतांना दिलासा नाहीच,पण जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलल्यामुळे नाराजी निर्माण होऊ शकते.