फुलगाव | लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांची वेशभूषा करून गांधीजींना जयंतीनिमित्त अभिवादन केले. गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व प्रतिमा पूजन करून ‘रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम’ या भजनाने महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली.
नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेतील इयत्ता आठवीचा विद्यार्थी सोहम सानप याने गांधीजींची वेशभूषा केली. तर, इयत्ता नववीचे विद्यार्थी नीरज सागोरा व शौर्य भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर गांधीजींच्या जीवनावर आधारित रेकॉर्डिंग विद्यार्थ्यांना ऐकवण्यात आले.
यासाठी प्राचार्य अमर क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेतील कलाशिक्षक शंकर साळुंखे यांनी गांधीजींचे रेखाचित्र रेखाटले. त्यानंतर गांधी जयंतीचे औचित्य साधून शालेय परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले सर्व विद्यार्थ्यांनी मिळून शालेय परिसर आणि क्रिकेट व फुटबॉलचे मैदान, वसतिगृह याठिकाणी स्वच्छता केली.
यावेळी लोकसेवा मुलींची सैनिकी शाळेच्या प्राचार्या लक्ष्मी कुलकर्णी व हिंदी विभाग प्रमुख विकास तिरखुंडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन सोमनाथ अवचर यांनी केले. तर, तानाजी पाटील, विशाल पिसे, बाळासाहेब कसबे, ज्ञानेश्वर जाधव, राजाराम डुबल, कडलक, ईश्वर पाटील, गणेश कणसे, रविराज दळवी यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्मय कांबळे यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.