फुलगाव | पुण्यातील खडकी येथील दारूगोळा कारखान्याद्वारे एमआयएलच्या पहिल्या स्थापना दिनानिमित्त शस्त्रास्त्र माहिती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली.
खडकी येथील दारुगोळा कारख्यान्यातील शस्त्र माहिती प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या शस्त्रांची विद्यार्थ्यांनी माहिती घेतली. त्या ठिकाणी असलेल्या बॉम्ब, मिसाईल, रणगाडे, रायफलीतील गोळ्या, रायफल्स इत्यादी संरक्षण क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या शस्त्रे विद्यार्थ्यांनी पाहिली आणि त्याची त्यांनी माहिती घेतली. याठिकाणच्या शस्त्रास्त्र संग्रहालयाला देखील विद्यार्थ्यांनी भेट देऊन माहितीचे संकलन केले.
सैनिकी शाळेत शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना संरक्षण दलातील शस्त्रास्त्रांची माहिती असायला हवी या हेतुने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. सैनिकी शाळेतील प्रशिक्षक ईश्वर पाटील व लाठीकाठी प्रशिक्षक अशोक पवार यांनी या भेटीचे संयोजन केले.