दसरा मेळाव्याची लढाई संपल्यानंतर आता शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातली पुढची लढाई पक्षाच्या चिन्हाबाबत असणार आहे. शिवसेनेतील फुटीनंतर धनुष्यबाण चिन्ह कुणाचं यावर निवडणूक आयोगासमोर सुरु असलेल्या लढाईत आजचा दिवस महत्त्वाचा आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांना आज आपली बाजू निवडणूक आयोगात मांडायची आहे. ठाकरे गट आज दुपारी एक वाजता आपलं प्राथमिक उत्तर निवडणूक आयोगात दाखल करणार आहे. त्यासाठी खासदार अनिल देसाई आणि वकिलांची टीम दिल्लीत दाखल झाली आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 14 ऑक्टोबर ही आहे. त्याआधी चिन्हाचं काय होणार याकडे लक्ष लागलं आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे गटाकडून चिन्हाचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप शिंदे गटाकडून केला जात आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्हाचा निकाल तात्काळ लावा अशी मागणी शिंदे गटाने निवडणूक आयोगाला केली आहे. यासंदर्भात शिंदे गटाकडून 4 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहिण्यात आलं आहे.