पुणे | पुणे शहर परिसरात मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केले आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी 4 परदेशी मुलींची सुटका केली आहे.ही कारवाई पोलिसांनी गुरुवारी (दि.6) कोरेगाव पार्क येथे केली आहे. ज्यामध्ये पोलिसांनी स्पाचा चालक व मॅनेजर यांना अटक केली असून त्यांच्यावर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना बातमी मिळाली की, कोरेगाव येथे एक स्पा चालक मसाज च्या नावाखाली वेशागमनासाठी परदेशी मुलींचा पुरवठा करतो. त्यानुसार पोलिसांनी नकली ग्राहक पाठवून सापळा रचून आरोपींना अटक केली. यावेळी पोलिसांनी तेथून चार परदेशी महिलांची सुटका केली. तसेच 28 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल यावली जप्त केला.
ही कारवाई सुरक्षा विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, महिला पोलीस अंमलदार मनिषा पुकाळे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत,अजय राणे, प्रमोद मोहिते, संदिप कोळगे, अमित जमदाडे, पुष्पेंद्र चव्हाण यांनी केली.