सध्या बदलत्या जीवनशैलीनुसार आरोग्याकडे म्हणावे तसे लक्ष देता येत नाही. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. त्यातीलच एक भाग ह्रदयविकाराचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक (Heart Attack). सध्या अगदी तरुणांनाही हार्ट अटॅकचा मोठा धोका निर्माण होताना दिसत आहे. हार्ट अटॅक येण्यामागची कारणे अनेक आहेत. पण सौम्य झटका जरी आला तरी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वेळीच लक्ष दिल्यास पुढील धोका टाळता येऊ शकतो. हार्ट अटॅक येण्यामागची कारणे आहेत तरी काय? ते टाळण्यासाठी काय करावे? याची माहिती आपण आज घेणार आहोत…
हार्ट अटॅक येण्यामागची कारणे काय?
- हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये वंगण कमी झालं तर रक्त हृदयापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकत नाही. या अडथळ्यामुळे हृदयामध्ये रक्ताची कमतरता होऊन वेदना सुरू होतात. हृदयाच्या आत रक्ताभिसरण थांबले तर तो भाग निष्क्रिय होतो. शरीर हा भाग पुन्हा सक्रिय करु शकत नसेल तर तेव्हा हार्ट अटॅक येतो.
- शरीरात बी-12 कमी प्रमाणात असेल तर, रक्ताची गाठ तयार होते. त्यामुळे रक्त घट्ट होण्याची शक्यता असते. ही गाठ हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गेल्यास हार्ट अटॅक येतो. हार्ट अटॅक आल्याने कार्डिअॅक अरेस्टने रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते.
- व्यसनाधीनता हे हार्ट अटॅक येण्यामागचे मुख्य कारण असू शकते. दारू, सिगारेटची सवय ही तरुण वयात हार्ट अटॅक येण्याची सर्वात मोठी कारणे आहेत. जे या सवयींमुळे माणसांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाची लक्षणे दिसून येतात. शरीरातील लक्षणांच्या विकासासह, शरीरात फॅट वाढू लागते आणि हृदयरोग होतो.
- 30-45 वयोगटातील लोक त्यांच्या लाईफस्टाइलमध्ये इतके व्यस्त होतात की ते त्यांच्या आरोग्याकडे, खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाहीत. सर्व वेळ तो ऑफिसमध्ये कॉम्प्युटर वापरतात आणि घरी परत आल्यावरही ते स्मार्टफोनमध्ये गुंतलेले असतात. वर्क लोड केल्याने थेट रक्तवाहिन्यांवर परिणाम करतो. यामुळे तरुण पिढी आणि मध्यमवयीन लोक ब्लड प्रेशरसारख्या आजारांना बळी पडत आहेत.
हार्ट अटॅकची लक्षणे काय?
- कमरेच्या वर, जबडा, मान, छातीच्या मध्यभागी किंवा हातांमध्ये किंवा ओटीपोटात 5 मिनिटांपेक्षा जास्त काळ दुखत असेल तर ते हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते.
- श्वासोच्छवासासह, शरीर थंड पडतंय असं वाटतं असेल तरी त्यामागे हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते.
- याशिवाय घाम येणं, अस्वस्थ वाटणे, थकवा किंवा चक्कर येणे ही लक्षणे हृदयविकाराचा संकेत असू शकतात.
हार्ट अटॅक येऊ नये म्हणून काय करावे?
- नियमित व्यायाम करावा. आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
- 35 वर्षांपेक्षा जास्त वयाचा किंवा उच्च कोलेस्टेरॉल, बीपी, मधुमेह, लठ्ठपणा किंवा हृदयाशी संबंधित समस्यांचा कौटुंबिक इतिहास असलेल्या अशा व्यक्तीने नियमितपणे हृदय तपासणी केली पाहिजे.
- आळशी जीवनशैली, चरबीयुक्त अन्न खाणं आणि खूप धूम्रपान करणं टाळावे. त्याचप्रमाणे अनुवंशिक कारणांमुळे हृदयाचं आरोग्य बिघडू लागते.
- तणावाखाली राहून तुमचे शरीर आणि मन कधीही निरोगी राहू शकत नाही. तणावाचा तुमच्या हृदयावर आणि मनावर मोठा परिणाम होतो. जर तुम्हाला हृदयाच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर तणावापासून दूर राहा.
- जर छातीत दुखणे क्षणिक असेल किंवा सुईच्या टोचण्यासारखे असेल तर ते इतर कारणांमुळे देखील होऊ शकते. छातीत दुखत असेल तर नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
‘