वॉशिंग्टन : सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन, लॅपटॉपसारख्या गॅजेट्स वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचा फायदा कसा करायचा हे अनेकांना अद्यापही माहिती नाही. मात्र, अमेरिकेतील एका 29 वर्षीय तरुणाने याचा योग्य वापर करून करोडपती बनला आहे. इतकेच नाही तर तो वर्षाला सुमारे 11 कोटींची कमाईही करत असल्याचा दावा त्याने केला आहे.
चार्ली चांग असे या तरुणाचे नाव आहे. तो कॅलिफोर्निया येथे राहतो.चांग हा तरुण युट्यूबवर अनेक व्हिडिओ बनवून शेअर करतो. त्यातून तो करोडपती बनला आहे. या युट्यूबरने दावा केला की, ‘एक वर्षाची कमाई 11 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मी डॉक्टर बनू इच्छित होतो. मात्र, मला प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यानंतर मी लहान मुलांना शिकवण्याचे ठरवले. आता माझी कमाई वाढली आहे’. चांग हा तरुण लोकांना व्हिडिओच्या माध्यमातून आर्थिक सल्ला देतो. 2014 मध्ये त्याने कॉलेज सोडले.
चार्ली याने पाच वर्षांपर्यंत मुलांचे क्लासेस घेतले. मॉडेलिंग केले आणि आपला व्यवसाय सुरु केला होता. मात्र, यातून मिळणाऱ्या पैशांवर तो समाधानी नव्हते. त्यानंतर त्यांनी युट्यूबवर लक्ष दिले. चांग याने दररोज युट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करणे सुरु केले. हळूहळू त्यांचे व्ह्यूजही वाढणे सुरु झाले. त्यांचे व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.आता याच माध्यमातून कोट्यवधींची कमाई होत आहे.