पुणे | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच आता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील नाराजीवरून मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ‘सरकारमध्ये कोणीही नाराज नाही. नाराजांची व्यवस्था करण्यात येते’, असे ते म्हणाले.
निधी वाटपावरून शिंदे गट आणि भाजप नेत्यांमध्ये मतभेद उघड झाले आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली. शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असे विधान त्यांनी केले होते.आता चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘सरकारमध्ये कोणीही नाराज नाही. नाराजांची व्यवस्था करण्यात येते’.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने मागील अडीच वर्षात अभूतपूर्व काम केले, ज्याची दखल जागतिक पातळीवरही घेण्यात आली. कर्जमाफी देण्याचा निर्णय आम्ही सर्वप्रथम घेतला. शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून महाराष्ट्राला प्रत्येक गोष्टीत कमीपणा घ्यावा लागत आहे, असेही जयंत पाटील यांनी म्हटले होते.