मुंबई | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांनी भाजपने माघार घेताच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सर्वांचे आभार मानले आहे. त्यांनी म्हटले की, ‘मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानते. मला सगळ्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे’.
भाजपने पोटनिवडणुकीत माघार घेतल्याने मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यानंतर ऋतुजा लटके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानते. सर्व पक्षातील जे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडून जी पत्र गेली. त्यांनी जी माझे पती रमेश लटके यांच्या कामाबद्दल आणि त्यांचं प्रत्येकाशी असलेलं सहकार्याचं नातं’. प्रत्येकजण म्हणत होतं की माझे सहकारी होते. माझ्याबरोबर होते. त्या कामाची पावती आणि त्यांच्याबरोबर असलेल्या संबंधामुळे आज मला हा सगळ्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे. त्यामुळे प्रत्येकाचे मी आभार मानते.
दरम्यान, भाजपने अंधेरी पोटनिवडणुकीत जरी भाजपने माघार घेतली असली तरी उर्वरित अपक्ष उमेदवार या निवडणुकीत माघार घेत नसल्याचे दिसत आहे. मात्र, आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने ही निवडणूक बिनविरोध होते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.