मुंबई | राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळातील 89 हजार अधिकारी-कर्मचारी वर्गासाठी 45 कोटी निधीची घोषणा केली आहे. त्यानुसार, एसटी अधिकाऱ्यांना पाच हजार आणि कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपये अशी दिवाळी भेट मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचारी सरकारच्या या निर्णयाची वाट पाहत होते. त्यानंतर राज्य सरकारने दिवाळी भेट देण्याची घोषणा केली आहे. याचा फायदा राज्यातील 89 हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे. दरम्यान, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार २१ ऑक्टोबरपूर्वी करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं आज जारी केले होते. त्यानंतर आता कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटीची घोषणा केली आहे. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी आता गोड होणार आहे.