दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांनी आत्महत्या केली आहे. भायखळा येथे ते राहत होते. त्याच इमारतीच्या 23व्या मजल्यावरुन उडी मारुन त्यांनी आत्महत्या केली आहे. अद्याप त्यांच्या आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही.
मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आणि दक्षिण मुंबईतील अनेक चाळींचं रिडेव्हलपमेंट करणारे प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांनी आज आत्महत्या केली आहे. भायखळा येथील राहत्या इमारतीच्या 23व्या मजल्यावरुन उडी मारुन त्यांनी आत्महत्या केली. सकाळी 6 ते 7 वाजताच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पारस पोरवाल यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. घटनेची माहिती मिळताच काळाचौकी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.