गुजरातमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीकडून मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल इतकी होती. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी 10.26 वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची खोली जमिनीखाली 7 किमी होती.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार हा भूकंप गुजरातमधील सुरतपासून 61 किमी अंतरावर झाला आहे. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
यावर्षी ऑगस्ट महिन्यातही गुजरातमधील कच्छ भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता 3.2 इतकी मोजली गेली होती. गांधीनगरच्या सिस्मिक रिसर्च इन्स्टिट्यूटने सांगितले होते की, हा भूकंप कच्छमध्ये संध्याकाळी 7.43 च्या सुमारास झाला. या दरम्यान कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नव्हते.