मुंबई | एसआरए घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोर पेडणेकर यांची चौकशी व्हावी अशी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन मागणी केली होती. त्यांनी आपल्या ट्विटर मार्फत पेडणेकरांना आज पुन्हा दादर पोलिस स्टेशनमध्ये यावे लागणार असे सांगितले.
दादर पोलिस स्टेशनमध्ये १२ एसआरए फ्लॅट्सच्या विक्री प्रकरणी चौकशी सुरु आहे. किश कॉर्पोरेट कंपनीविरुद्ध मरीन लाईन पोलिस स्टेशनमध्येही चौकशी सुरु आहे. या कंपनीला बीएमसीचं कोविडमध्ये कंत्राट मिळालं होतं. आपली यासंदर्भातील याचिका असल्याचं सोमय्यांनी सांगितलं.
एसआरए’मध्ये फ्लॅट देण्याच्या नावाखाली दादर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणी चौघांवर अटकेची कारवाई झालेली आहे. या चौकशीतून किशोरी पेडणेकर यांचं नाव पुढे आलं होतं. काल पेडणेकरांची पंधरा मिनिटं चौकशी झाली. त्यानंतर आज पुन्हा दादर पोलिसांनी पेडणेकरांना चौकशीसाठी बोलावलं आहे.
दरम्यान , गोमातानगर मध्ये ज्या गाळ्यांप्रकरणी त्यांची चौकशी केली जाणार आहे तिथे स्वतः किशोर पेडणेकर गेल्या असताना किरीट सोमय्यांकडून दबावतंत्राचा वापर केला जातोय. चौकशीसाठी मी जाणार नाही. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे असा आरोप त्यांनी केला आहे. तर संजय राऊतांनंतर टार्गेटवर मी आहे का असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला आहे. ह्याचा हिशोब तर द्यावाच लागेल किरीट सोमय्या काय दुध के धुले आहेत का? असा सवाल पेडणेकर यांनी केला आहे.