मुंबई | महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला नेण्यात आले. त्यावरून राज्यात राजकारण सुरु झाले आहे. त्यातच आता भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी एअरबस आणि वेदांता-फॉक्सकॉनवर खोटं बोलणाऱ्या प्रमुख सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांची नार्कोटेस्ट करावी, अशी मागणी ट्विट करून केली आहे.
राम कदम यांनी या प्रकल्पांवरून विरोधी पक्षांना धारेवर धरले आहे. त्यांनी ट्विट करून टीका केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, एअरबस आणि वेदांता-फॉक्सकॉनवर खोटं बोलणाऱ्या प्रमुख सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांची नार्कोटेस्ट करावी. वेदांता-फॉक्सकॉनच्या टीमने तळेगावला जागा फायनल करून सुद्धा त्यांना इतर राज्यात का जावे लागले? त्यांच्याकडून कोणी आणि किती टक्केवारी, कमिशन मागितले? असा सवाल करत पुढे म्हणाले, कोणत्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मीटिंग झाली? मीटिंगला कोण-कोण उपस्थित होते? वेदांताने जागा फायनल करून सुद्धा त्यांच्या सोबत MOU का केला नाही? कंपनीच्या प्रमुख लोकांना भेटण्यास टाळाटाळ का? आणि कोणाच्या सांगण्यावरून केली? नेमकं हेच कारण एअरबसच्याबाबतीत सुद्धा आहे का?
दरम्यान, नार्कोटेस्टने सर्व गुपित आणि वसुलीच्या कहाण्या समोर येतील. सत्तेच्या काळात ज्यांनी छोट्या-मोठ्या हॉटेलवाल्यांपासून कॉन्ट्रॅक्टरपर्यंत आणि बदल्यामध्ये किती करोड रुपये घायचे. याची लिस्टच बनवली होती. ज्यांनी वाझेपासून अधिकाऱ्यांना वसुली-वसुली खेळात जुपले होते. पोलिसांनासुद्धा ज्यानी सोडलं नाही. ते करोडो-करोडोंच्या प्रोजेक्टला सहज काही वसुली न करता सोडतील का?, असेही ट्विट कदम यांनी केले आहे.