शिमला | माझे वडीलही राजकीय क्षेत्राशी संबंधित आहेत. माझ्या वडिलांना काँग्रेसबद्दल प्रेम वाटत असे. पण जेव्हा 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हा आम्ही पूर्णपणे भाजप आणि मोदींमध्ये कन्व्हर्ट झालो. इतकेच नाही तर माझे वडील सकाळी जय मोदी आणि संध्याकाळी जय योगी म्हणतात, असे बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) हिने सांगितले.
हिमाचल प्रदेशातील शिमला येथील एका कार्यक्रमात कंगणा राणावत हिने वक्तव्य केले. तुमचे कुटुंबीय काँग्रेसला पाठिंबा देत होते. असे विचारल्यावर ती म्हणाली, ‘मी राजकीय क्षेत्राशी निगडीत आहे. माझ्या वडिलांना काँग्रेसबद्दल प्रेम वाटत असे. पण जेव्हा 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हा आम्ही पूर्णपणे भाजप आणि मोदींमध्ये कन्व्हर्ट झालो. इतकेच नाही तर माझे वडील सकाळी जय मोदी आणि संध्याकाळी जय योगी म्हणतात. माझी आई आणि वडील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. ते प्रत्येक व्यक्तीशी वैयक्तिक पातळीवर कनेक्ट आहेत. त्यांना वाटते की पंतप्रधान मोदी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांपैकीच एक आहेत’.
राजकारणात येणार का?
कंगनाला राजकारणात प्रवेश करणार का? असा सवाल केला होता. त्यावर ती म्हणाली, राजकारण सुखाचा मार्ग नाही. जनतेची सेवा करायची आहे. जर समाजासाठी काही करायचे असल्यास तुम्हाला वैयक्तिक जीवनाचा त्याग केला पाहिजे आणि पुढे जात राहिले पाहिजे. मात्र, मी राजकारणात येण्याबाबत काहीही विचार केला नाही. पण जर पुढे देशासाठी काही करायची संधी मिळाली तर यावर नक्की विचार करेन, असेही तिने सांगितले.