पुणे | पुना गुजराती केळवणी मंडळाची सोमवार दिनांक ०२ नोव्हेंबरला आर.सी.एम. गुजराती स्कूल, दारूवाला पूल येथे नवीन कार्यकारीणी संदर्भात सभा पार पडली. या सभेमध्ये पुढील तीन वर्षांसाठी संस्थेच्या चेअरमनपदी राजेश शहांची तर नितीनभाई देसाई यांची प्रमुख पदावर सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. जनक शहा यांची व्हाईस चेअरमन पदी, हेमंत मणियार यांची मानद मंत्री पदी तर महेश धरोड यांची खजीनदार पदी निवड करण्यात आली. या सभेला संस्थेचे माजी चेअरमन किरीट भाई शहा, दिलीप शहा, मोहनभाई गुजराती, अशोक सुरतवाला यांच्यासह सर्व ट्रस्टी व कौन्सिल मेंबर्स उपस्थित होते.
पुना गुजराती केळवणी मंडळ ही शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी सुमारे ९७ वर्षे जुनी अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेची स्थापना सन १९२५ मध्ये करण्यात आली. जे. पी. त्रिवेदी यांनी सन १९२५ साली दहा विद्यार्थ्यांना घेऊन सुरु केलेल्या या संस्थेचे म्हणजे एका लहानश्या रोपट्याचे आज एका वटवृक्षात रूपांतर झाले आहे. पुना गुजराती केळवणी मंडळ या संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयांमधून सुमारे ९००० पेक्षा जास्त विधार्थी शिक्षण घेत आहेत. ही संस्था के.जी. ते पी.जी. पर्यंतचे दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून नावारूपाला आली आहे.
पुना गुजराती केळवणी मंडळ या संस्थेच्या आर सी एम गुजराती स्कूल, आचार्य डी. बी. दादावाला जुनियर कॉलेज, आर. एन. शहा इंग्लिश मिडीयम स्कूल, एच व्ही देसाई आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज, पी.जी.के.एम. स्कूल, हरिभाई देसाई विद्याधाम असे वेगवेगळे शैक्षणिक विभागांत मिळून साधारण ९००० विद्यार्थी विद्यार्थिनी नरसरी ते कॉलेज पर्यंतचे शिक्षण घेत आहेत.
नुकतेच कोंढवा येथे १.५ लाख चौरस फुटांचे नर्सरीपासून ते इयत्ता दहावी पर्यंतचे सीबीएसई पॅटर्नचे इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देणारे शैक्षणिक संकुल उभारण्यात आले आहे. या संकुलाचे गेल्या जून महिन्यामध्ये उदघाटन झाले आहे. तर के.जी. ते इयत्ता सहावी पर्यंतची सीबीएसई इंग्लिश मिडीयम डे स्कूल सुरु करण्यात आली. या शाळेत पहिल्याच वर्षी साधारण ९०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलचे अध्यक्ष राजेश शहा, पुना गुजराती बंधू समाज संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी, जनसेवा फाउंडेशनचे खजिनदार, पुना हॉस्पिटल, महावीर जैन विद्यालय, विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या संस्थांचे विश्वस्त, अनेक सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील संस्थाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. पुना गुजराती केळवणी मंडळ या संस्थेच्या प्रमुख पदावर निवड झालेले नितीनभाई देसाई हे एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय तसेच पुना गुजराती बंधू समाज या संस्थांचे चेअरमन म्हणून का