मुंबई | राज्य सरकारच्या सेवेसाठी सरकारकडून परीक्षा घेतल्या जातात. पण या परीक्षांमध्ये घोटाळे झाल्याचे पाहिला मिळाले होते. त्यानंतर आता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने यावर महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व परीक्षा भरती टीसीएस-आयओएन किंवा आयबीपीएस (IBPS) या संस्थांमार्फत घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या नोकरीसाठी इच्छुक उमेदवार अनेक प्रयत्न करत असतात. त्यानुसार ते परीक्षाही देतात. गेल्या वर्षभरात राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षा आणि म्हाडाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. मात्र, या दोन्ही परीक्षांमध्ये घोटाळे आणि गैरव्यवहार झाल्याचे दिसून आले होते. तसेच काही ठिकाणी पेपरफुटीच्या घटनाही घडल्या आहेत.
या सर्व बाबींची दखल घेत तत्कालीन सरकारने त्या परीक्षा ऐनवेळी रद्द केल्या होत्या. याचा फटका हजारो उमेदवारांना बसला होता. त्यानंतर आता पुन्हा अशाप्रकारच्या घटना घडू नये म्हणून सरकारने पावले उचलली आहेत. राज्यातील सर्व भरती परीक्षा या टीसीएस-आयओएन किंवा आयबीपीएस (IBPS) या संस्थांमार्फत घेण्यात येणार आहे.