नवी दिल्ली | आपण कुठं असतो हे इतरांना माहिती करून घ्यावसं वाटतं किंवा आपल्याला आपला मित्र, एखादी व्यक्ती कुठं आहे हे जाणून घ्यावसं वाटतं. त्यासाठी अनेक जण विविध अॅप्स, वेबसाईटचा वापर करतात. पण आता तुमचा हा प्रयत्न थांबवा कारण तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवरून लोकेशनविषयीची माहिती मिळवता येऊ शकते.
गुगलवर नंबरच्या माध्यमातून लोकेशन जाणून घेण्याचा प्रयत्नात तुम्ही हॅकर्सच्या जाळ्यात अडकू शकता. हॅकर्सने ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर याप्रकारे जाळं टाकलेले असतं. जेव्हा आपण कोणत्याही युजरचे लाईव्ह लोकेशन जाण्यासाठी गुगल सर्च करू, तेव्हा अनेक अशा वेबसाईट्स मिळतील. या वेबसाईटच्या माध्यमातून हॅकर्स आपल्या फोनवरून डाटा चोरी करू शकतात. त्यामुळे हे टाळाच.
अशी मिळेल लाईव्ह लोकेशनची माहिती…
WhatsApp च्या माध्यमातून लाईव्ह लोकेशन मिळवणं हा सोपा पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला ज्या कोणाचं लाईव्ह लोकेशन जाणून घ्यायचे असेल तर युजरकडून चॅटवरून लाईव्ह लोकेशनची मागणी करू शकतो. इतकेच नाही तर लाईव्ह लोकेशन गुगल मॅप्सच्या माध्यमातूनही शेअर करता येऊ शकते.