नवी दिल्ली | सध्या स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच जवळपास सर्वच मोबाईल फोनमध्ये ब्लूटूथ (Bluetooth) हे फिचर असतेच. हा ब्लूटूथचा पर्याय काहीजण सर्रासपणे सुरु ठेवतात. पण हे करणं धोक्याचं ठरू शकतं. कारण हॅकर्स याचा फायदा घेऊन तुमचे फोनवरील संभाषण ऐकू शकतात.
जेव्हा ब्लूटूथ सुरु असते तेव्हा हॅकर्स तुमचा डिव्हाईस पेअरिंग करतात आणि हॅक करण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपण यापासून सावध राहणे गरजेचे आहे. कोणत्याही अनोळखी ब्लूटूथ पेअरिंगला एक्सेप्ट करू नका. जेव्हा कधी आपले ब्लूटूथचे काम झाले असेल तेव्हा ब्लूटूथ बंद करावे.
हॅकर्स मोबाईलमध्ये मालवेअर इन्स्टॉल करतात. त्यामुळे भविष्यात युजरच्या डिवाईसचा एक्सेस अगदी सहजपणे मिळवता येतो. त्यामुळे हेरगिरी अगदी सहजपणे होऊ शकते. यात हॅकर्स फोनवरील संभाषण ऐकू शकतो. त्यामुळे आपण नेहमी सतर्क राहणे गरजेचे बनले आहे.