मुंबई | गेल्या एक महिन्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतींमध्ये प्रचंड मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. महागाई दराचा आलेख या महिन्यातही चढताच राहिला आहे. गेल्या महिन्य़ाभराच्या कालावधीत कांदा, टोमॅटो, बटाटासह सर्वच भाज्यांच्या खरेदीसाठी सर्वसामान्यांना किमान १००० रुपये द्यावे लागतात. उद्या म्हणजेच ३ डिसेंबरला रिझर्व्ह बॅकेचे तिमाही पतधोरण जाहीर होणार आहे. या जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमतींनी सामान्य माणसांचे मात्र हाल झाले आहेत.
कन्झ्युमर अफेअर्स मंत्रालयाच्या संकेतस्थळानुसार, ३० आँक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२२ दरम्यान कणिक ५.२४ टक्के महाग झाला आहे. गव्हाच्या कणकेची किंमत अंदाजे ३६.९७ रुपये प्रति किलोंवर पोहोचली आहे. याच कालावधीत तांदुळाच्या किंमतीत १.२७ टक्के, गव्हाच्या किंमती ४.८१ टक्के वाढून ३१.८३ रुपयांवर पोहोचल्या आहेत.
त्याबरोबरच, याच कालावधीत चणा डाळ ३.७२ टक्के महाग होऊन किंमत ७३.८१ रुपयांवर पोहोचल्या आहेत. उडीद डाळ २.१२ टक्के महाग होऊन ११२,९० रुपये प्रति किलो दराने विकल्या जात आहेत. मुगडाळ १.८३ टक्के महाग झाली आहे. तर मसूरडाळीच्या किंमतीमध्येही महागाईचे सावट आहे.
दूधाच्या किंमती देखील अंदाजे ३.८० टक्के वाढून ५५.६९ रुपयांवर पोहोचल्या आहेत. तर साखर २.०६ टक्के वाढून ४२.६८९ रुपये झाली आहे. गुळाच्या किंमतीतही १.८९ टक्के वाढ झाली असून ५०.६५ रुपयांवर पोहोचल्या आहेत.
महागाईचे सावट खाद्यतेलावर देखील तेवढ्याच प्रमाणात आहे. यामध्ये मोहरी तेलाच्या किंमतीत १.१९ टक्के वाढ झाली आहे. वनस्पती तेलाच्या किंतमीत ३.०३ टक्के वाढ होऊन त्या १४४.८२ रुपये दरात उपलब्ध आहेत. सोयाच्या तेलात २.९२ टक्के वाढ झाली आहे. सूर्यतेल २.३६ टक्क्यांनी महागले आहे. पाम आँईलही ०.९२ टक्के महाग झाल्याने ११७.१७ रुपये दराने विकले जात आहे.
या सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले असले तरीदेखील बटाटा आणि टोमॅटोच्या किंमतींमध्ये घट झाली आहे. बटाट्याच्या किंमती २.८३ टक्के घट झाली आहे. बटाटा आता २७.८४ रुपये दराने बाजारात विकला जात आहे. तर टोमॅटोच्या किंमती २३ टक्क्यांनी घसरल्या आहेत. मात्र कांद्याच्या किंमतीत या थेट ५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री तर लागणारच आहे मात्र, या महागाईमध्ये सर्वसामान्यांनी जगायचं कसं असा प्रश्न देखील उपस्थित होतो.