मुंबई | कर्नाटक-महाराष्ट्र या दोन्ही राज्यात सीमाप्रश्नावरून (Border dispute) वादंग सुरु आहे. त्यात महाराष्ट्रातील काही मंत्री कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, इतका तेढ निर्माण झाला असताना हे मंत्री दौऱ्यावर जाणार का याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठं विधान केले आहे.
सीमाप्रश्नावरून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यातील वातावरण तापले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर मोठं विधान केले आहे. ते म्हणाले, ज्या दोन मंत्र्यांनी कर्नाटक दौऱ्याची घोषणा केली होती. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्थानिकांनी आमंत्रित केले आहे. पण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मंत्री बेळगाव दौऱ्यावर जाणार की नाही? याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घेतील.
दरम्यान, अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. बेळगाव आणि कारवार ही गावे महाराष्ट्रात सामील करावीत, अशी मागणी आहे. मात्र, यावर अद्याप निर्णय होऊ शकला नाही. त्यानंतर आता महाराष्ट्रातील मंत्र्यांना कर्नाटकात येऊ नये, अशा शब्दांत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी इशारा दिला आहे. त्यांच्या या दौऱ्यावरच आता फडणवीस यांनी विधान केले आहे.