मुंबई | भारतीय क्रिकेट विश्वात आज खास दिवस आहे. कारण आज भारतीय संघातील पाच खेळाडूंचा जन्मदिवस आहे. आर. पी. सिंह, करुण नायर ,रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर या पाच खेळाडूंचा आज जन्मदिवस आहे. यातील तीन खेळाडू आज भारतीय संघात स्टार खेळाडू आहेत.
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आज 34 वर्षाचा झाला. गुजरातमध्ये 6 डिसेंबर 1988 ला जडेजा यांचा जन्म झाला. जडेजाने भारतासाठी 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. आत्तापर्यंत जडेजा भारतासाठी 171 एकदिवसीय, 64 टी-20 आणि 60 कसोटी सामने खेळले आहेत.
भारताचाच नव्हे तर जगात सध्याचा सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराह आज 28 वर्षांचा झाला आहे. बुमराहचा जन्म 6 डिसेंबर 1993 रोजी अहमदाबादमध्ये झाला. बुमराह भारताचा एक्स फॅक्टर म्हणून ओळखला जातो. बुमराह भारतासाठी तीनही फॉरमॅट खेळतो. जसप्रीत बुमराहने आतापर्यंत भारतासाठी 72 एकदिवसीय, 60 टी-20 आणि 30 कसोटी सामने खेळले आहेत.
मराठमोळा खेळाडू श्रेयस अय्यर आज 28 वर्षांचा झाला. श्रेयसचा जन्म 6 डिसेंबर 1993 रोजी मुंबईत झाला. श्रेयसने भारतासाठी आत्तापर्यंत 49 टी-20, 37 एकदिवसीय आणि पाच कसोटी सामने खेळले आहेत. श्रेयस भारताचा स्टार फलंदाज आहे.
एकेकाळचा भारताचा कसोटीमधील स्टार फलंदाज करुण नायर आज 31 वर्षाचा झाला. करुणने भारताचा फलंदाज वीरेंद्र सेहवागची बरोबरी केली आहे. सेहवागनंतर भारतासाठी 300 चा आकडा पार करणारा भारताचा दुसरा खेळाडू आहे.
भारतीय संघाचा माजी फलंदाज आर.पी. सिंह आज 37 वर्षांचा झाला. आरपीचा जन्म उत्तर प्रदेशात झाला. आरपीने 2006 मध्ये पाकिस्तानविरुद्ध फैसलाबाद कसोटीत धमाकेदार सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात तो ‘मॅन ऑफ द मॅच ठरला.