मुंबई | शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. त्यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले. “सुषमा अंधारे आधी माझ्या पक्षातही होत्या पण सध्या शिवसेनेत नेत्यांची कमी आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेत उपनेतेपद दिलं आहे”, असे आठवले म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून सुषमा अंधारे अनेक जाहीरसभांमध्ये दिसत आहे. त्यांच्याकडून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले जात आहे. त्यातच आता रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, “शिवसेनेने सुषमा अंधारेंना टीका करण्यासाठीच आणलं आहे. अंधारे आमच्याही पक्षात होत्या. पण आता त्या शिवसेनेत गेल्या आहेत. त्या तशा संघर्षशील वक्त्या आहेत. त्या काही वर्षे माझ्या पक्षात होत्या. पण सध्या शिवसेनेत नेत्यांची कमी आहे. त्यामुळे त्यांना उपनेतेपद दिलं आहे”.
दरम्यान, सुषमा अंधारे आधी माझ्या पक्षातही होत्या. पण सध्या शिवसेनेत नेत्यांची कमी आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेत उपनेतेपद दिले आहे. अंधारे या टीका करण्यात ‘एक्सपर्ट’ आहेत, असेही ते म्हणाले.