मुंबई | बॉलिवूडसाठी 2022 हे वर्ष फार काही चांगले गेल्याचे दिसत नाही. कारण यावर्षी बॉलिवूडवर ‘बॉयकॉट’चे ग्रहण लागले आहे. आता वर्षाच्या शेवटीही हे ग्रहण जाण्याचे नाव घेईना. बॉलिवूडचा किंग खान शाहरुखच्या ‘पठाण’वर बॉयकॉटच्या भोवऱ्यात आहे.
शाहरुख त्याचा नवा चित्रपट पठाण घेऊन त्याच्या चाहत्यांच्या भेटीला येत असताना मात्र हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. शाहरुखला सध्या सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. झाले असे की, काही दिवसांपूर्वी शाहरुख मंदिरात गेला होता. नेटकऱ्यांना त्याचं वागणं काही पसंद पडले नाही व त्याचा संबंध त्याच्या आगामी चित्रपटाशी जोडला जात असून, आता हा चित्रपट सोशल मीडियावर ‘बॉयकॉट’ होत आहे.
दीपिका व शाहरुखचे गाणे सोशल मीडिया आल्यावर त्यातील आक्षेपार्ह दृश्य पाहून नेटकऱ्यांचा राग आणखीनच वाढला आहे. त्यात दीपिका भगव्या बिकिनीत दिसल्याने हिंदूंचा अपमान केल्याच्या चर्चा देखील सोशल मीडियावर सुरू आहे.