पटना | बिहारमध्ये बनावट दारू प्यायल्याने 38 जणांचा मृत्यू झाला. त्यावर मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी विधान केले आहे. त्याचीच चर्चा होत आहे. ‘जो कोणी बनावट दारूचे सेवन करेल तो मरणारच. लोकांनीच आता सावधगिरी बाळगायला हवी’, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितले.
बिहारमध्ये दारूबंदी आहे. त्यामुळे राज्यात दारू मिळत नसल्याने काही लोकांकडून बनावट दारू तयार केली जात आहे. हीच बनावट दारू प्यायल्याने बिहारमधील अनेकांचा मृत्यू झाला. त्यावर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले की, जेव्हा बिहारमध्ये दारूबंदी नव्हती. तेव्हा लोकं बनावट दारू पिऊन मरत होते. इतकेच नाही तर इतर राज्यातही अशाप्रकारे घटना घडत आहेत. त्यामुळे लोकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. बिहारमध्ये दारूबंदी आहे.
तसेच ते पुढे म्हणाले, दारूचे व्यसन ही वाईट सवय आहे. त्याचे सेवन टाळायला हवे. मी अधिकाऱ्यांना सक्त सूचना केल्या की, गरिबांना पकडू नका तर जे कोणी याचा व्यवसाय करत आहेत त्यांना पकडा. दारूबंदीमुळे अनेकांना फायदा झाला. अनेकांनी दारू सोडली.