रत्नागिरी | ”मनसेने कोणासोबत जायचे हे राज ठाकरे ठरवतील. राज ठाकरे हे राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक नेते आहेत. त्यांनी कुणासोबत जावे हा त्यांचा निर्णय आहे. पण ते आमच्यासोबत आले तर वेलकम”, असे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी म्हटले आहे.
अब्दुल सत्तार हे रत्नागिरीत बोलत होते. ते म्हणाले, ”मनसेने कोणासोबत जायचे हे राज ठाकरे ठरवतील. राज ठाकरे हे राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक नेते आहेत. त्यांनी कुणासोबत जावे हा त्यांचा निर्णय आहे. पण ते आमच्यासोबत आले तर वेलकम. आमच्या सर्व नेत्यांनी त्यांना सन्मानाने आमच्यासोबत येण्याचे आवाहन केले आहे. पण शेवटी निर्णय राज ठाकरे यांचा आहे. ते काय निर्णय घेतील हे कुणीही सांगू शकत नाही”.
दरम्यान, कितीही लोक आले तरी सरकार कधी घाबरत नाही. कायदा सुव्यवस्था कायम राहील, याची विरोधकांनी खबरदारी घ्यावी. शेवटी काही नियम असतात, काही धोरण असतात त्याचे पालन करावे आणि मोर्चा काढावा. आम्ही कुणाला अडवले नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे, असेही सत्तार यांनी यावेळी सांगितले.