मुंबई : मुंबईला येणाऱ्या धमक्यांमुळे सध्या सर्वत्र सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रणाला धमकीचे मेसेज आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मेसेजनंतर पोलिसांकडून सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आली असून यामध्ये विरारमधून अटक करण्यात आली होती. अशात आता या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या व्हॉट्सअप नंबरवरून पोलिसांना धकमीचे मेसेज आले होते. त्या नंबरवर एका रिपोर्टरने फोन केला आणि तो समोरच्या व्यक्तीने उचललाही. यानंतर त्यांमध्ये जे संभाषण झालं ते वाचून तुम्हालाही मोठा धक्का बसेल. यावरून कोणीतरी मेसेज वैगरे करून फसवणूक करत असल्याचं समोर येतं पण तरीही यामुळे मुंबईकरांची धाकधूक वाढली आहे.
झी न्यूजच्या प्रतिनिधी अश्विन पांडे यांनी मुंबई पोलिसांना 26/11 च्या हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला फोन केला आणि तो म्हणाला की, ‘मी लाहोरचा आहे, मला मेसेज कसा पाठवायचा हेदेखील कळत नाही’. यावर रिपोर्टरकडून सविस्तर विचारणा करण्यात आली असता माझा नंबर कोणी दुसरं वापरत असावं, कारण याआधीही मला असे फोन आले, अशी माहिती संबंधित व्यक्तीकडून देण्यात आली.
रिपोर्टरने फोन केला असता व्यक्तीने सांगितलं की तो पाकिस्तानमधील पंजाबमध्ये एमडी हाऊसमध्ये माळी म्हणून काम करतो. मला मेसेजही करता येत नाही, त्यामुळे या मेसेजबद्दल काहीही माहिती नाही. फोनही कोणाच्या हातात दिला नाही, असंही या व्यक्तीने सांगितलं. त्याचं नाव विचारला असता मोहम्मद इम्तियाज असं सांगितलं. तो एक सरकारी नोकर असून त्याला याबद्दल काहीही माहिती नाही. अशात त्याच्या नंबरवर कोणी दुसरं व्हॉट्सअपवर वापर असल्याचंही तो म्हणाला. त्यामुळे या सगळ्याची चौकशी होणार असून पुढे काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.