पुणे | लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड तर्फे कौन बनेगा नेता? यासाठी निवडणूक होत आहे. यासाठी चार उमेदवार रिंगणात उतरले असून येत्या 30 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. अशा प्रकारची ही पहिलीच निवडणूक होत आहे. या निवडणुकीतून जिंकणाऱ्या उमेदवार ह्याला लायन्स गणेशखिंड नेता या नावाने गौरवीणे जाणार आहे व क्लब जास्तीत जास्त मानव सेवा करू शकेल ह्यावर त्यांचे लक्ष असणार आहे.
या निवडणुकीसाठी चारही उमेदवारांनी मंगळवारी (20 डिसेंबर) उमेदवारी अर्ज भरला. ही निवडणूक लोकशाही पद्धतीने होणार आहे.
निवडणुकीसाठी लायन्स व्हिजनरी पार्टीकडून मनोज छाजेड निवडणूक लडवित असून त्यांचे सिंह चिन्ह आहे. लायन्स समृद्धी पार्टी तर्फे मयूर शाह उमेदवार आहेत. दुधाची बाटली हे त्यांचे चिन्ह आहे. लायन पॉवर पार्टीच्या वतीने नरेंद्र गोयल उमेदवार आहेत आणि त्यांचे उगवणारा सूर्य हे चिन्ह आहे. लायन्स जोशीली पार्टीचे शशिकांत चमाडीया निवडणुकीच्या आखाड्यात उतरले असून त्यांचे चावी हे चिन्ह आहे.
या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून पी के मेहता काम पाहत आहेत.
“निवडणुकीत आम्ही एकमेकांच्या विरोधात असलो तरी निवडणुकीनंतर जो उमेदवार विजयी होईल त्यांच्या सोबत आम्ही सर्व मिळून काम करू,” अशी भावना चारही उमेदवारांनी व्यक्त केली.
ही निवडणूक फन म्हणून होत असली तरी निवडणुकीत उभा राहिलेल्या चारही उमेदवारांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. अशी माहिती क्लब चे अध्यक्ष राजीव अग्रवाल यांनी दिली