अमरावती | बडनेरचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी रवी राणा यांचे खासगी सचिव विनोद गुहे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, आता पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
ठाकरेंविरुद्ध आक्रमक भूमिका घेणारे आमदार रवी राणा यांना मोबाईलवरून ठार मारण्याची धमकी देण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील 8 ते 10 दिवसांपासून रवी राणा यांना मोबाईलवर धमक्या येत असल्याची तक्रार सचिव विनोद गुहे यांनी दिली. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्याबाबत एकही शब्द उच्चारला तर पिस्तूल आणि चाकूने ठार मारेन, अशी धमकी दिली.
दरम्यान, राणा यांना धमक्यांचे फोन येत असल्याने त्यांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीची चौकशी करून त्याला अटक करावी, अशी मागणी केली आहे.