मुंबई | “देवेंद्र फडणवीस यांना भ्रष्टाचाराविरोधात पुन्हा लढावं लागणार आहे. त्यांना या भ्रष्ट सरकारचं ओझ जास्त दिवस वाहता येणार नाही. कृषीमंत्र्यांनी खंडणी गोळा केली आहे. संपूर्ण सरकार सध्या अडचणीत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सहानुभूती वाटते, असे शिवसेना (उ.बा.ठा.) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले.
हिवाळी अधिवेशात विरोधकांनी जमिनीच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या अधिवेशनात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही उपस्थिती लावली आहे. खासदार संजय राऊतही नागपूरमध्ये उपस्थित आहेत. त्यावेळी ते म्हणाले, ”उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना अधिवेशनात भ्रष्टाचार विरोधात लढले आणि आता सत्तेत असताना आम्ही भ्रष्टाचार विरोधात लढत आहे. त्यांना हा लवंगी बॉम्ब वाटतो. देवेंद्र फडणवीस बदलले आहेत”.
दरम्यान, सीमाप्रश्नावरचा ठराव हा अत्यंत महत्वाचा आहे. सीमाप्रश्नाचा ठराव वाहून जाऊ नये आणि सरकारला कारण मिळू नये. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.