नागपूर | शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांवर गैरव्यवहाराचे आरोप केले जात आहेत. त्यावरून विधिमंडळात विरोधकांकडून सरकारला धारेवर धरण्याचे काम केले जात आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी म्हटले की, ”विरोधकांच्या आरोपांना मंत्री उत्तर देतील आणि आमच्या सरकारचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काही तथ्य असतील तर कारवाई करतील”.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात एसआयटी चौकशीचा आदेश दिल्यानंतर मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी विरोधक करत आहेत. या संदर्भात आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली.
आमदार गायकवाड म्हणाले, “मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमिनीसंदर्भात अनेक आरोप झाले आहेत. या आरोपांना दोघेही मंत्री सभागृहात प्रत्युत्तर देतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस सभागृहात सांगितलं आहे जर यामध्ये कोणत्याही तथ्य असेल तर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे विरोधक आरोप करत आहेत. मंत्री उत्तर देतील आणि आमच्या सरकारचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस काही तथ्य असतील तर कारवाई करतील”.