मुंबई | भारतीय 20-20 मालिका होण्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. हार्दिक पांडेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंडवर विजय मिळवण्याच्या तयारीत आहे. पण त्याआधीच स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाडने या मालिकेतून माघार घेतली आहे. त्याच्या मनगटाला दुखापत झाल्यामुळे तो या मालिकेपासून वंचित राहणार आहे.
बीसीसीआयने त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल होण्यास सांगितले आहे. 20-20 मालिकेसाठी तो रांची येथे दाखल न होता मनगट दुखत असल्याचे त्याने बीसीसीआयला कळवले. बीसीसीआय त्याच्या जागेवर इतर खेळाडूचे नाव जाहीर करण्याची शक्यता कमी आहे.
भारताने 20-20 मालिकेसाठी जाहीर केलेल्या संघात ओपनिंगसाठी तीन पर्यात आहेत. पृथ्वी शॉ या मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. ऋतुराजला मागच्या वर्षी श्रीलंकेविरुद्धच्या 20-20 मालिकेलाही मुकावे लागले होते. यावेळी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही.
दरम्यान, ऋतुराज 20-20 मालिकेसाठी बरा होण्याची शक्यता कमी आहे. त्याच्या जागी बदली खेळाडूची निवड करणार कि नाही हे निवड समिती ठरवेल असे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.