मुंबई | भारतीय संघात सध्या तरुणांना संधी दिली जात आहे. पण या संधीमुळे निवडणूक समिती व संघ प्रशिक्षकांची डोकेदुखी वाढली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने संघातील एका युवा खेळाडूला ही वाईट बातमी सांगितली.
पृथ्वी शॉ सध्या चांगली कामगिरी करून आला आहे. पण त्याला सध्या संघात स्थान मिळणे कठीण आहे. तसेच शुभमनचीही कामगिरी चांगली आहे. त्याला डावलून पृथ्वीला स्थान देणे थोडे कठीण आहे. कर्णधार हार्दिक पांड्याने माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
ट्रिपल सेंच्युरियन पृथ्वीला संघात स्थान मिळवण्यासाठी आणखी वाट पाहावी लागेल हे आता स्पष्ट झाले आहे.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
शुभमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, कुलदीप यादव.