मुंबई | भारताचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंग हा त्याच्या डेथ ओव्हरसाठी ओळखला जातो. पण अर्शदीपने श्रीलंकेसोबत झालेल्या मालिकेपासून नो बॉलची मालिका सुरु केली आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने पहिल्या तीन षटकांमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली.
अर्शदीपने पहिल्या तीन षटकांमध्ये एकही नो बॉल न टाकता केवळ २४ धावा दिल्या होत्या. त्यानंतर त्याने शेवटच्या षटकांत २७ धावांची उधळण केली. यामुळे न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत १७६ धावा केल्या.
दरम्यान, या आव्हानासमोर भारताला केवळ ९ बाद १५५ धावाच करता आल्या. अर्शदीपने चार षटकांच्या स्पेलमध्ये ५१ धावांत केवळ एक विकेट घेतली. आपल्या शेवटच्या षटकांत २७ धावांची उधळण करून अर्शदीपने आपल्या नावावर एक लाजीरवाणी विक्रम नोंदवला आहे.
डावाच्या २० व्या षटकात सर्वाधिक धावा देणारे भारतीय –
२७- अर्शदीप सिंग २०२३
२६- सुरेश रैना २०१२
२४- दीपक चहर २०२२
२३- खलील अहमद २०१८
२३- हर्षल पटेल २०२२