मुंबई| गेल्या काही दिवसांपासून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. गेले अनेक दिवस प्रचार चालू होता. अखेर आज पाच जागांसाठी मतदान पार पडणार आहे.
नाशिक, अमरावती पदवीधर, तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी असे हे मतदान होणार आहे. तर २ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
पहिल्यांदाच बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपची युती या निवडणुकीला सामोरी जात आहे. त्यामुळे पाचही मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होणार आहे. त्यातच सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारी अर्जामुळे नाशिक मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.