मुंबई | गेल्या काही दिवसांपासून शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगली होती. नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि कोकण अशा एकूण पाच जागांसाठी हे मतदान झाले आहे. या शिक्षक पदवीधर मतदारसंघांचा निकाल आज जाहीर होणार आहे.
राज्याचे लक्ष नाशिक मतदारसंघाकडे लागले आहे याचे कारण म्हणजे काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी यावरून बंडखोरी करत थेट अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सत्यजित तांबे विरुद्ध मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यामध्ये थेट लढत पाहायला मिळत आहे.
दरम्यान, कोकणात भाजपाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे हे तब्बल २०,६४८ मतांनी विजयी झाले आहेत तर, शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा पराभव झाला आहे.