पुणे | सध्या पुण्यातील पोटनिवडणूकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुका लवकरच पार पडणार आहेत. अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामध्ये भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेळ आहे उमेदवार बदलता येईल असं मोठे विधान केले आहे.
निवडणूक बिनविरोध करण्याच्या आवाहनानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हंटलं होतं की, जर मुक्ता टिळक यांच्या घरी ही उमेदवारी दिली असती तर बिनविरोध करण्याचा विचार केला असता. त्यांच्या या वक्तव्यानंतर बावनकुळे यांनी हे सूचक वक्तव्य केलं आहे.
मविआचा उमेदवार नसेल तर आम्ही टिळकांच्या घरातच उमेदवारी द्यायला तयार आहे. महाविकासआघाडीने आजचं कळवलं तर उद्याचा दिवस बाकी आहे. निश्चितपणे तसा निर्णय घेता येईल.
दरम्यान, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना आजही ही निवडणुक बिनविरोध व्हावी अशी विनंती देखील बावनकुळे यांनी केली आहे.