नवी दिल्ली | गेल्या आठ महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात शिवसेना कुणाची? यावर राजकारण सुरु आहे. गेल्या दोन दिवसांपासून सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु होती. परंतू महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा हा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे.
आज जवळजवळ 3 तास युक्तिवाद झाला त्यानंतर ही सुनावणी राखून ठेवण्यात आली आहे. या प्रकरणातील युक्तीवाद पूर्ण झाले आहेत. न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे.
विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असताना अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतो की नाही, याच मुद्द्यावर हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे देण्याची उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांनी मागणी केली आहे. पुन्हा पाच न्यायाधीशांचे खंडपीठ रेबिया खटल्यावर पुनर्विचार करु शकते का यावर सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे.
आज शिंदे गटाने युक्तीवाद केला. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी प्रतिवाद केला.
शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या मागणीवर 5 न्यायाधीशांच खंडपीठ सुनावणी करणार की हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. शिंदे गटासाठी आणि ठाकरे गटामध्ये हि लढत अटीतटीची बनली आहे.
दरम्यान, सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला आहे. ७ जणांच्या खंडपीठाकडं हे प्रकरण जाणार का? हा प्रश्न कायम आहे.